Rain In Pune : अवेळी पावसामुळे सोशल मीडियावर ‘जोक्स’ आणि ‘मीम्स’चा पाऊस

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत पावसाने अवेळी हजेरी लावली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात आज (दि.01, डिसेंबर) सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. दिवसभरात पावसाने पाच मिनिटे देखील उसंत घेतली नसून, अद्यापही पावसाची संततधार सुरू आहे. दिवसभर शहरावर सर्वत्र धुक्याची चादर पसरली होती. हिवाळ्यात पाऊस पडत असल्याने नवा ऋतु ‘हिवसाळा’ सुरू झाला आहे असे अनेक ‘जोक्स’ आणि ‘मीम्स’ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

पाहा तुमच्या फोनवर सुद्धा असे मेसेजेस आले असावेत –

 

  • ‘दर वर्षी शाळा सर्वसाधारण पणे 15 जून ला सुरु होतात, त्यावेळी पाऊस असतो, यंदा शाळा 1 डिसेंबर ला सुरु झाली , मुलांना वेगळं वाटू नये, शाळा जून मध्ये च सुरु झाल्याचा फिल यावा यासाठी आज पाऊस आला आहे…’ 😂😂😂

 

  • ‘पूर्वी पाऊस पडला की लोकांना ‘बसायची’ इच्छा होत होती
    आता नुसता विचार मनात आला तरी पाऊस पडतोय’

#मौसम मस्ताना 🤦🤦🤦

 

  • ‘तो परत आलाय…?

पाऊस म्हणतोय मी. तुमच्या मनात भलतंच.’

 

  • ‘आजपासून शाळा सुरू होणार होत्या म्हणून पावसाला वाटलं जून महिना असेल😄
    प्राथमिक घरगुती अंदाज..’

 

  • ‘या पावसाचं पण मोकाट वळू सारखं झालंय, मधेच थांबतोय तर अचानक उधळतोय!

 

  • ‘Raincoat घालावा की sweater हा एकच सवाल आहे’ 🙄

#पुणे #पाऊस #थंडी

 

  • ‘पुणे धुक्यात…. आज वाफ आणि हाफ… दोन्ही लागणार बहुधा… ‘ 😂😂😂

 

  • ‘कोल्हापूर सारखा पाऊस पुण्यात पडतो आहे पण कोल्हापूर सारखी पुरी भाजी पुण्यात मिळत नाही त्याच काय…’ 😜😜

#पाऊस #पुरी_भाजी #कोल्हापूर

 

  • ‘जागते रहो 😳

#पुणे
#थंडी_आणि_पाऊस
#कामाचा_करेक्ट_कार्यक्रम’

दरम्यान, अरबी समुद्रावरून येणारी उंच ढगांमुळे गोवा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, मुंबई, पालघर, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, अहमदनगर, नाशिक, औरंगाबाद, जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.