Kalewadi : प्रतिबंधित इम्पोर्टेड सिगारेट व सुगंधी तंबाखूजन्य पदार्थ बाळगल्या प्रकरणी दोन जणांना घेतले ताब्यात

एमपीसी न्यूज : प्रतिबंधित इम्पोर्टेड सिगारेट व प्रतिबंधित सुगंधी तंबाखूजन्य पदार्थ (Kalewadi) बाळगल्या प्रकरणी दोन जणांना ताब्यात घेतल्याची घटना काळेवाडी येथे घडली आहे.

गोपाळ कोंढाळे (वय 35 वर्षे, आधार कॉलनी नंबर एक, तापकीर चौक, काळेवाडी) आणि संदीप मौर्य (वय 25 वर्षे, रा. पवना नगर कॉलनी नंबर 2, मस्जिद शेजारी काळेवाडी) या दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्या विरुद्ध कलम 328, 279, 270, 272, 273, 188 तंबाखूजन्य जाहिरात प्रतिबंध 2003 चे कलम 7, 20 अन्वये वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

28 डिसेंबर रोजी सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास गजानन पान शॉप, मानकर चौक, वाकड येथे त्यांना (Kalewadi) ताब्यात घेण्यात आले आहे. सदर आरोपींनी महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनाने मुखाचे कर्करोग व इतर विकार होऊन शारीरिक हानी होऊ शकते हे माहीत असताना देखील एकूण 18,160 किंमतीचा प्रतिबंधित इम्पोर्टेड सिगारेट व प्रतिबंधित सुगंधी तंबाखूजन्य पदार्थ असा माल विक्रीसाठी ठेवला होता. भैय्या (रा. विशाल नगर, पिंपळे निलख पूर्ण नावमाहित नाही), तेजाराम देवासी (रा. बाणेर पुणे, पूर्ण नाव पत्ता माहित नाही) व राजू (पूर्ण नाव पत्ता माहित नाही) यांनी हा माल पुरविला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.