Talegaon Dabhade News : जांबवडे गावच्या प्रथम महिला सरपंच कविता भांगरे यांचे निधन 

एमपीसी न्यूज – जांबवडे गावच्या प्रथम महिला सरपंच कविता संजय भांगरे (52)यांचे रविवारी (दि.04) अल्पशा आजाराने निधन झाले. जांबवडे गावच्या तंटा मुक्ती समितीचे अध्यक्ष संजय दत्तोबा भांगरे यांच्या त्या पत्नी तर, उद्योजक मदन भांगरे, चेतन भांगरे, विक्रांत भांगरे यांच्या त्या मातोश्री होत. प्रगतिशील शेतकरी नारायण भांगरे, माजी ग्रामपंचायत सदस्य नथू भांगरे यांच्या त्या सुनबाई होत.

त्यांच्या मागे पती, तीन मुले, सुना सासरे, दीर, पुतणे, नातवंडे, असा मोठा परिवार आहे. सन 1999-2004 या पाच वर्षांच्याकालावधीत त्यांनी जांबवडे गावच्या सरपंच पदाची धुरा सांभाळली. या काळात त्यांनी अंतर्गत रस्ते, सांडपाणी व्यवस्था आणि सुधारित पाणी पुरवठा योजना मार्गी लावली. त्यांच्या पुढाकाराने निशीगंधा महिला बचत गट स्थापन करण्यात आला. त्या माध्यमातून महिलांना रोजगार मिळाला.

जांबवडे येथील स्मशानभूमीत रविवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पंचायत समितीचे माजी उपसभापती तथा विद्यमान सदस्य शांताराम बापू कदम, जांबावडे गावचे पोलीस पाटील जगन्नाथ नाटक पाटील यांनी श्रद्धांजली समर्पित केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.