Khed Car Accident : कारच्या धडकेत भाजी विक्रेत्याचा मृत्यू

एमपीसी न्यूज – रस्त्याच्या बाजूला (Khed Car Accident)भाजी विक्रीसाठी बसलेल्या एकाला भरधाव वेगातील कारने जोरात धडक देऊन फरफटत नेले. कार अंगावरून चालवून त्यांना गंभीर जखमी केले. त्यात भाजी विक्रेत्याचा मृत्यू झाला. हा अपघात निघोजे येथे एआरएआय कंपनीसमोर गुरुवारी (दि. 4) रात्री घडला.

जनार्दन पुंजाजी पुंडगे (वय 58) असे मृत्यू झालेल्या भाजी विक्रेत्याचे नाव आहे. याप्रकरणी त्यांच्या पत्नी कमलाबाई जनार्दन पुंडगे (वय 50, रा. निघोजे, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एमएच 14/जेए 8727 कारवरील चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

KFC Fraud : केएफसीची फ्रेंचाइजी देण्याच्या बहाण्याने नऊ लाखांची फसवणूक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचे पती मयत जनार्दन हे एआरएआय कंपनीसमोरील रस्त्यावर भाजी विक्री करत होते. गुरुवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास अज्ञात कार चालकाने कार भरधाव वेगात चालवून जनार्दन यांना जोरात धडक दिली. त्यांना काही अंतरापर्यंत फरफटत नेऊन त्यांच्या अंगावरून गाडी चालवली. यामध्ये त्यांच्या छातीला, पाठीला, डोक्यात गंभीर दुखापत झाली. गंभीर जखमी झाल्याने जनार्दन यांचा मृत्यू झाला. अपघात घडल्यानंतर आरोपी कार चालक घटनास्थळावरून पळून गेला. चाकण (Khed Car Accident) पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.