Khed Crime News : होलेवाडीत पूर्वीच्या भांडणातून डोक्यात दगड घालून एकाचा खून

एमपीसी न्यूज – पूर्वीच्या भांडणातून वार करत डोक्यात दगड घालून एका इसमाचा खून केल्याची घटना होलेवाडी (ता. खेड) येथे उघडकीस आली. 11 ते 12 जुलै दरम्यान हा प्रकार घडला. याप्रकरणी सहा जणांविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अतुल कल्याण वाडेकर (वय 31, रा. बहुळ, ता. खेड ) यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मिलिंद विठ्ठल जगदाळे, बंटी विठ्ठल जगदाळे, मयुर विठ्ठल जगदाळे, सचिन शांताराम पाटणे, तौसिफ शेख, प्रविण मारुती थिगळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांचा भाऊ राहुल याचा पूर्वीच्या भांडणातून वार करत डोक्यात दगड घालून खून केला. दाखल फिर्यादीवरून सहा जणांविरोधात भारतीय दंड विधान कलम 302, 143, 147, 149 अंतर्गत खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खेड पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.