Khed Crime : खेड येथे गावठी पिस्तूल व काडतूसासह तरुणाला अटक

एमपीसी न्यूज – खेड पोलिसांनी (Khed Crime) एका तरुणाला गावठी पिस्तूल व काडतूसासह अटक केली आहे. हि कारवाई गुरुवारी (दि.28) रात्री अकराच्या सुमारास करण्यात आली.

गणेश सुखराज गोसावी ( वय 22, रा,. राक्षेवाडी, खेड) असे अटक आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री खेड पोलीस परिसरात गस्त घालत असताना त्यांना बातमी मिळाली की, राक्षेवाडी येथे एका तरुणाकडे बेकायदेशीर शस्त्र आहे. त्यानुसार पोलीस घटनास्थळी पोहचले. तेथे त्यांनी गणेशला ताब्यात घेतले असता, त्याच्याकडून गावठी कट्टा व एक जिवंत काडतूस असा एकूण 35 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याचा पुढील तपास खेड पोलीस करीत आहेत.

Thergaon Crime : ओव्हरटेक करण्याच्या कारणावरून तरुणाला चाकूने भोकसले

ही कारवाई (Khed Crime) गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल लाड, पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले, पोलिस अंमलदार. संतोष घोलप, स्वप्निल गाढवे, निखील गिरीगोसावी, सचिन जतकर, शेखर भोईर, सुधीर शितोळे, रमेश दाते यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.