Talegaon : तळेगावात खंडणी देण्यास नकार दिला म्हणून दुकानदाराला मारहाण

एमपीसी न्यूज  – तळेगाव (Talegaon) दाभाडे येथील शिवाजी चौकातील दुकानदाराला खंडणी मागत मारहाण केली व पैसेही हिसकावून नेले आहेत.  हि घटना बुधवारी (दि. 27) रात्री अकरा वाजता घडली. पोलिसांनी या प्रकरणी आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

हरीश पप्पू शर्मा (वय 24, रा. तळेगाव दाभाडे) यांनी या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार हर्ष प्रमोद साठे (वय 19, रा. वराळे, ता. मावळ), कुमार सुरेश मोहिते (वय 19, रा. तळेगाव दाभाडे), अनिल सुरेश मोहिते (वय 21, रा. समता कॉलनी, तळेगाव दाभाडे), जय उर्फ कीटक प्रवीण भालेराव (वय 18, रा. तळेगाव दाभाडे) यांना अटक करण्यात आली आहे.

Khed Crime : खेड येथे गावठी पिस्तूल व काडतूसासह तरुणाला अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव दाभाडे येथील शिवाजी चौकात फिर्यादी यांचे आईसक्रीमचे दुकान आहे. बुधवारी रात्री अकरा वाजता आरोपी फिर्यादी (Talegaon) यांच्या दुकानात आले. आरोपींनी फिर्यादीकडे हप्त्याची मागणी केली. हप्ता न दिल्याने आरोपींनी दुकानातील वस्तूंची तोडफोड करून कामगारांना मारहाण केली. फिर्यादीच्या खिशातील पाच हजार रुपये बळजबरीने काढून घेतले. पोलिसांनी चोघांना अटक केली असून तळेगाव दाभाडे पोलीस पुढिल तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.