Kivle : किवळे येथे होर्डिंगखाली तीनजण अडकले

एमपीसी न्यूज – देहूरोड कात्रज बाह्यवळण महामार्गावर किवळे (Kivle) येथे एक होर्डिंग कोसळले. या होर्डिंग खाली दोन ते तीन जण अडकल्याची शक्यता आहे. ही घटना सोमवारी (दि. 17) सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास घडली.

सोमवारी सायंकाळी पिंपरी चिंचवड शहर परिसरात सोसाट्याचा वारा सुटला. यामध्ये देहूरोड कात्रज बाह्यवळण महामार्गावर केवळ येथे रस्त्याच्या बाजूला लावलेले एक होर्डिंग कोसळले. या होर्डिंग खाली दोन ते तीन व्यक्ती अडकले आहेत.

Rahatani : सोसायट्यांच्या क्रिकेट स्पर्धेत रॉयल एलेगन्स सोसायटी प्रथम

 

वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारी यांनी सांगितले की, साडेपाच वाजताच्या सुमारास किवळे येथे होर्डिंग पडल्याची माहिती मिळाली. त्यानुसार रावेत पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. कटरच्या साह्याने होर्डिंग कट करून, तसेच जेसीबीच्या सहाय्याने होर्डिंग बाजूला करण्याचे काम सुरू आहे. कोणतीही (Kivle) जीवित हानी झालेली नसल्याचेही गवारी यांनी सांगितले.

सोमवारी सायंकाळी आलेल्या वादळामध्ये शहरात अन्य ठिकाणी देखील होर्डिंग कोसळल्याची माहिती मिळत आहे. निगडी मधील ओटास्कीम येथे देखील वादळात होर्डिंग आणि सिग्नलचा खांब कोसळल्याची प्राथमिक माहिती आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.