Crime News : खराबवाडी येथे चाकू बाळगल्या प्रकरणी तरुणाला अटक

एमपीसी न्यूज – चाकू बाळगल्या प्रकरणी म्हाळुंगे एमआयडीसी (Crime News) पोलिसांनी तरुणाला अटक केली. ही कारवाई सोमवारी (दि. 27) सायंकाळी सव्वासात वाजताच्या सुमारास खेड तालुक्यातील खराबवाडी येथे घडली.

वैभव काशिनाथ बाचणे (वय 24, रा. मेदनकरवाडी, ता. खेड. मूळ रा. परभणी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्यानुसार पोलीस अंमलदार अमोल माटे यांनी म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Hinjawadi News : पोलिसाला बेदम मारहाण करत दिली जिवे मारण्याची धमकी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खराबवाडी येथे एकजण संशयितपणे थांबला असल्याची माहिती म्हाळुंगे एमआयडीसी पोलिसांना माहिती मिळाली. (Crime News) त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून वैभव याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून पोलिसांनी 300 रुपये किमतीचा चाकू जप्त केला आहे. म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.