Mumbai News : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना कोरोनासह न्यूमोनियाची लागण, मुंबईत उपचार सुरू 

एमपीसी न्यूज – गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना कोरोनासह न्यूमोनियाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. 92 वर्षीय लता मंगेशकर यांच्यावर मुंबईतील ब्रिच कॅंडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुढचे 10 ते 12 त्यांना निरिक्षणाखाली ठेवले जाणार आहे. 

‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, जेष्ठ गायिका लता मंगेशकर यांना मंगळवारी कोरोनाची लागण झाली. त्यांना सौम्य लक्षणं आहेत. दरम्यान त्यांना न्यूमोनियाची देखील लागण झाली आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून, त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. पुढचे 10 ते 12 त्यांना निरिक्षणाखाली ठेवले जाणार आहे. अशी माहिती ब्रिच कॅंडी रुग्णालयाच्या वतीने देण्यात आली आहे.

लता मंगेशकर यांनी हिंदी, मराठी, बंगाली यासह वेगवेगळ्या प्रादेशिक भाषेत हजारों गाणी गायली आहेत. त्यांना भारतरत्न, पद्म विभूषन, पद्मभूषण, दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.