Pune News : तृतीयपंथीयांना प्रमाणपत्र व ओळखपत्रासाठी राष्ट्रीय पोर्टल सुरु 

एमपीसी न्यूज – सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, नवी दिल्ली यांच्याकडून तृतीयपंथीय व्यक्तींना प्रमाणपत्र व ओळखपत्र मिळण्यासाठी राष्ट्रीय पोर्टल सुरु करण्यात आले आहे. तृतीयपंथी व्यक्तींना या पोर्टलवर  आपली नोंदणी करुन प्रमाणपत्र व ओळखपत्र मिळवता येईल. 

तृतीय पंथीयांच्या हक्कांचे संरक्षण अधिनियम 2019 अंतर्गत जिल्हास्तरीय समितीद्वारे तृतीयपंथीयांना त्यांचे ओळख प्रमाणपत्र व ओळखपत्र देण्याची तरतुद आहे. त्याअंतर्गत सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाने राष्ट्रीय पोर्टल सुरु केले आहे.

नोंदणीसाठी पोर्टल

https://transgender.dosje.gov.in

या राष्ट्रीय पोर्टलवर उपलब्ध माहितीनुसार, आतापर्यंत 2 हजार 647 जणांना प्रमाणपत्र तर, 2 हजार 644 जणांना ओळखपत्र देण्यात आले आहे. देशातील 33 राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांनी यामध्ये सहभाग घेतला आहे.

दरम्यान, पुणे जिल्हा तृतीयपंथीयांना प्रमाणपत्र व ओळखपत्र देण्यात आघाडीवर आहे. पोर्टलवर ऑनलाइन प्राप्त असलेल्या 22 अर्जांपैकी 12 तृतीयपंथीयांना जिल्हा प्रशासन व सहायक आयुक्त समाज कल्याण पुणे यांच्या प्रयत्नातुन  ओळखपत्र देण्यात आले. जिल्हाधिकारी यांच्या स्वाक्षरीचे ओळख पत्र व ओळख प्रमाणपत्र जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते देण्यात आले. राज्यात प्रथमच देण्यात पुणे जिल्हयाने आघाडी घेतली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.