Bhandarkar Sanstha : विविध देशातील युवा नेत्यांची भांडारकर संस्थेला भेट

एमपीसी न्यूज : विविध देशातील संसदेच्या 25 युवा नेत्यांनी आज भांडारकर संस्थेला (Bhandarkar Sanstha) भेट देवून येथील प्रकल्पांची माहिती घेतली. त्यावेळी त्यांचे स्वागत संस्थेचे कार्याध्यक्ष भूपाल पटवर्धन आणि मानद सचिव प्रा. सुधीर वैशंपायन यांनी केले. यावेळी शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थ शिरोळे देखील उपस्थित होते.

Bhandarkar Sanstha

Bullock Cart Race : बैलगाडा शर्यतीची परदेशी प्रेक्षकांनाही भुरळ, नेदरलँडमधील प्रेक्षकांनी अनुभवला शर्यतींचा थरार

भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद जगभरातील विविध 75 लोकशाहीप्रधान देशातील युवा नेत्यांना भारतात आमंत्रित करणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून बांगलादेश, ब्रुनाई, घाना, नेपाळ, नॉर्वे आणि पेरु या 6 देशातील युवा नेत्यांनी गेले दोन दिवस पुणे व परिसरातील महत्वाच्या सांस्कृतिक स्थळांना भेटी दिल्या. त्यात भांडारकर संस्था (Bhandarkar Sanstha), फिल्म इन्स्टिट्यूट, केळकर संग्रहालय, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थांचा समावेश होता.

Pimpri News : बहुआयामी व्यक्तीमत्व स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे जीवनचरित्र अभ्यासले पाहिजे – घोडके

भांडारकर संस्थेमधील प्राचीन आणि दुर्मिळ ग्रंथ पाहतांना हे सर्व युवा नेते हरखून गेले होते. येथील संशोधन तसेच डिजीटलायझेशन प्रकल्पांची देखील त्यांनी माहिती घेतली. भांडारकर संस्थेमध्ये चालणारे ऑनलाईन कोर्सेसबाबत त्यांनी विशेष उत्सुकता दाखवली. या युवा नेत्यांमध्ये बहुतेक तेथील संसदेतील खासदार आहेत तर काही तेथील सामाजिक, सांस्कृतिक संस्थांचे पदाधिकारी आहेत. भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या पुणे विभागाच्या संचालिका निशी बाला आणि प्रकल्प संचालिका संजीवनी स्वामी यांनी या भेटीचे आयोजन केले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.