Bullock Cart Race : बैलगाडा शर्यतीची परदेशी प्रेक्षकांनाही भुरळ, नेदरलँडमधील प्रेक्षकांनी अनुभवला शर्यतींचा थरार

एमपीसी न्यूज – बैलगाडा शर्यत (Bullock Cart Race) आता ‘लोकल टू ग्लोबल’ असा प्रवास करताना दिसत आहे. महाराष्ट्राचा हा रांगडा खेळ पाहण्यासाठी विदेशी प्रेक्षकांनी हजेरी लावली. नेदरलँडमधील तीन प्रेक्षकांनी घाटात उपस्थित राहून बैलागाडा शर्यतींचा थरार अनुभवला. दुसऱ्या दिवशी सुमारे 15 हजार बैलगाडा प्रेमींनी हजेरी लावली.

बैलगाडा शर्यत टाळगाव चिखली येथील रामायण मैदानावर सुरू आहे. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी शनिवार असल्यामुळे बैलगाडा शौकींनांसह सर्वसामान्य नागरिकांनी रामायण मैदानावर मोठी गर्दी केली होती. चाकण औद्योगिक पट्टयातील जीकेएन एरोस्पेस कंपनीचे संचालक असलेली तीन विदेशी नागरिक बैलगाडा शर्यतीला उपस्थित राहिले. मार्टिन दुर्विले, जोस्ट दुर्विले आणि युस्ट कम्पहुइस अशी तिघांची नावे आहेत. भारतीय संस्कृतीप्रमाणे महाराष्ट्रीय फेटा बांधून स्वागत करण्यात आहे. पाहुण्यांना अगदी वाजत-गाजत घाटात आणण्यात आले. उपस्थित श्रोत्यांनी जल्लोष करीत विदेशी (Bullock Cart Race) पाहुण्यांचे स्वागत केले.

Bullock Cart Race

Pimpri News : ‘सोळावं वरीस मोक्याचं’, 15 ते 21 वयोगटातील युवांसाठी 5 जून रोजी विशेष मार्गदर्शनपर शिबिर

मार्टिन दुर्विले म्हणाले की, एवढ्या मोठ्या प्रमाणात होणारी बैलगाडा शर्यत मी प्रथमच अनुभवत आहे. महाराष्ट्रातील नागरिकांनी आमचा सन्मान केला. या सन्मानाने आम्ही भारावून गेलो. इथली संस्कृती आम्हाला भावते. बैलांप्रति इथल्या लोकांना असलेला जिव्हाळा कौतुकास्पद आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.