Pimpri-Chinchwad RTO : पक्क्या अनुज्ञप्तीसाठी(लर्निंग लायसेन्स) विशेष ‍शिबिराचे आयोजन

एमपीसी न्यूज – वाहन चालवण्यासाठी आवश्यक शिकाऊ अनुज्ञप्तीची (लर्निंग लायसेन्स) मुदत ऑक्टोबर 2021 अखेर संपणाऱ्या उमेदवारांसाठी पक्की अनुज्ञप्ती मिळण्याच्या दृष्टीने पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे विशेष शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवडचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांनी याबाबात माहिती दिली. पक्क्या अनुज्ञप्तीसाठीच्या ऑनलाईन अपॉईंटमेंटचा प्रतिक्षा कालावधी कमी करण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. पक्क्या अनुज्ञप्तीच्या चाचणीसाठी 21 व 22 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजता ऑनलाईन वेळ उपलब्ध होईल.

त्या अनुषंगाने वेळ आरक्षित (स्लॉट बुक) करुन शनिवार (दि. 23) आणि रविवार (दि. 24) रोजी चाचणीसाठी सकाळी 9 वाजता उमेदवारांनी उपस्थित रहावे. येणाऱ्या उमेदवारांनी कोरोनाविषयक सर्व नियमांचे पालन करावे, असे आवाहन पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.