Lonavala : द्रुतगती मार्गावर आजपासून वेगमर्यादा ताशी 100 कि मी

वेगमर्यादेचे उल्लंघन केल्यास कारवाई

एमपीसी न्यूज- पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर वाहनांचा वेग कमी करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने घेतला आहे. सध्या ताशी120 किमी ची वेगमर्यादा असून आता ही वेगमर्यादा रविवार मध्यरात्री 12 वाजल्यापासून ताशी 100 किमी अशी करण्यात आली आहे. द्रुतगती मार्गावरील अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी वेगमर्यादा कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

चालकासह आठ प्रवासी असलेली वाहने प्रति तास 100 किमी, नऊ पेक्षा अधिक क्षमतेची प्रवासी वाहने प्रतितास 80 किमी तर मालवाहू वाहने प्रतितास 80 किमी या वेगाने चालवावी लागणार आहेत. त्याचप्रमाणे सर्व बोगद्यांमध्ये वेगमर्यादा 80 किमी प्रतितास तर वळण रस्त्यावर प्रतितास ३० किमी या वेगाने वाहने चालवावी लागणार आहेत.

मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणार असल्याचे वाहतूक विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक कार्यालयातील अधीक्षक विजय पाटील यांनी स्पष्ट केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.