Lonavala Crime News : तुंगार्ली तलावात बुडालेल्या तरुणाचा मृतदेह दोन दिवसानंतर सापडला

एमपीसी न्यूज – तुंगार्ली तलावात बुडालेल्या तरुणाचा मृतदेह दोन दिवसानंतर सापडला. शिवदुर्ग रेस्क्यू टीम आणि एनडीआरएफच्या जवानांनी बुडालेल्या तरुणाचा मृतदेह शोधला. ही घटना सोमवारी (दि. 16) घडली होती.

अमित गुप्ता (वय 24, रा. वसई) असे बुडालेल्या तरुणाचे नाव आहे.

शिवदुर्ग रेस्क्यू टीमचे सुनील गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित गुप्ता सोमवारी त्याच्या कुटुंबातील सदस्य आणि मित्रांसोबत लोणावळा जवळील तुंगार्ली तलावात फिरण्यासाठी आला होता. तलावात पोहण्यासाठी गेल्यानंतर तो अचानक बुडाला.

अमितच्या मित्रांनी सुरुवातीला त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना यश आले नाही. याबाबत शिवदुर्ग टीमला माहिती मिळाल्यानंतर टीमच्या सदस्यांनी घटनास्थळी धाव घेत तात्काळ शोधमोहीम सुरू केली. सोमवारी रात्री उशिरापर्यंत शोध घेतल्यानंतरही अमितचा शोध लागला नाही.

त्यामुळे मंगळवारी (दि. 17) सकाळी पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात आली. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत अमितचा शोध न लागल्याने पुन्हा शोधमोहीम थांबवण्यात आली.

बुधवारी (दि. 18) सकाळी पुन्हा शिवदुर्ग टीमने शोधमोहीम सुरु केली. सकाळी साडेदहा वाजता एनडीआरएफचे जवान शिवदुर्ग टीमच्या मदतीला आली. दोन्ही पथकांनी शोध घेतला. बुधवारी दुपारी पावणे दोन वाजता अमितचा मृतदेह शोधण्यात दोन्ही पथकांना यश आले.

शिवदुर्ग टीमचे केदार देवळे, सागर कुंभार, प्रविण देशमुख, अजय शेलार, प्रणय अंबुरे, राहुल देशमुख, दुर्वेश साठे, सतिष मेलगाडे, अशोक उंबरे, अभिषेक गायकवाड, राजेंद्र कडु, पुनिकेत गायकवाड, सारंग गायकवाड, विकास मावकर, राजु पाटील, सुनिल गायकवाड, भगवान घनवट, अनिल सुतार, आनंद गावडे, अनिल आंद्रे, चंद्रकात बोंबले यांच्यासह एनडीआरएफच्या जवानांनी अमितचा शोध घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.