Lonavala: लोणावळा नगरपरिषदेकडून रॅपिड अँटीबॉडी तपासणी मोहीम

Lonavala: Rapid Antibody Testing Campaign by Lonavala Municipal Council नगरपरिषदेला आज शंभर किट उपलब्ध झाल्याने त्यामधून भाजीपाला विक्रेत्यांची प्राधान्याने तपासणी करण्यात आली. त्यामध्ये तीन जण संशयित मिळून आले.

एमपीसी न्यूज- लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने आज (दि.19) लोणावळा शहरात भाजी विक्री करणार्‍या शंभर विक्रेत्यांची रॅपिड अँटीबॉडी तपासणी करण्यात आली. यामध्ये तीन जण संशयित सापडल्याने त्यांना कोरोना तपासणीसाठी कोव्हिड केअर सेंटरला पाठविण्यात आले.

मंगळवारपासून लोणावळा शहरात सात दिवसाचा बंद पाळण्यात येणार आहे. या दरम्यान शहरातील भाजी विक्रेते, किराणा माल विक्रेते, पेपर विक्रेते, लोणावळा नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी या सर्वांची अँटीबॉडी तपासणी करण्यात येणार आहे.

नगरपरिषदेला आज शंभर किट उपलब्ध झाल्याने त्यामधून भाजीपाला विक्रेत्यांची प्राधान्याने तपासणी करण्यात आली. त्यामध्ये तीन जण संशयित मिळून आले. खबरदारी म्हणून त्यांची कोरोना तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी रवी पवार यांनी दिली.

नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, मुख्याधिकारी रवी पवार, प्रशासन अधिकारी शरद कुलकर्णी, उद्योजक मुकेश परमार, बाजार विभागप्रमुख सुर्यवंशी आदी यावेळी उपस्थित होते. रॅपिड अँन्टीबॉडी तपासणीमुळे संशयित रुग्ण सापडण्यास मदत होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.