Maval : वेदांता फॉक्सकॉन कंपनी स्थलांतरावरून भाजपायुतीचे महाविकास आघाडी सरकारविरोधात आंदोलन

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात नियोजित असलेला वेदांता फॉक्सकॉन कंपनीचे (Vedanta Foxconn) गुजरातमध्ये स्थलांतर झाले. याचा दोष तत्कालीन महाविकास आघाडी सरकारचा आहे. महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi) जनतेची दिशाभूल केली असल्याचे भाजपयुतीकडून सांगितले जात आहे. तत्कालीन राज्य सरकारच्या विरोधात मावळ भाजपा,शिवसेना (शिंदे गट) व आरपीआय यांच्यावतीने निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे अशी माहिती मावळ तालुका भाजपा अध्यक्ष रवींद्र (आप्पा) भेगडे व तालुका युवा मोर्चा अध्यक्ष संदीप काकडे यांनी दिली. 
सोमवारी (दि.२६) सकाळी साडेदहा वाजता पोटोबा मंदिर ते पंचायत समिती या दरम्यान हा मोर्चा काढण्यात येणार आहे.
याप्रसंगी खासदार श्रीरंग बारणे, माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे, महाराष्ट्र प्रदेश भाजपा प्रवक्ते,आमदार राम कदम, पुणे जिल्हा भाजपा अध्यक्ष गणेश भेगडे, पुणे जिल्हा आरपीआय अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
वेदांता-फॉक्सकॉन (Vedanta Foxconn) कंपनी स्थलांतरित संदर्भात महाराष्ट्रातील व मावळच्या जनतेची दिशाभूल करणा-या महावसुली आघाडी विरोधात निषेध व्यक्त करण्यासाठी सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे अशी विनंती तालुका अध्यक्ष रविंद्र भेगडे व युवा मोर्चा अध्यक्ष संदीप काकडे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.