Mahadev Jankar : जनतेने ठरवलं, तर सुप्रिया सुळे यांना हरवणे अवघड नाही

एमपीसी न्यूज : केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन पुढील काही दिवसात बारामती दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या या दौऱ्यावरून आता पुन्हा एका नव्या राजकारणाला सुरुवात झाली आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी या संपूर्ण घडामोडीवर प्रतिक्रिया दिली आहे. महादेव जानकर म्हणाले बारामतीत बदल होऊ शकतो. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा निवडणुकीत प्रभाव झाला होता. तसाच बारामतीतही बदल होऊ शकतो. बारामती लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांचे प्राबल्य असलं तरीही भाजपने लक्ष केंद्रित केल्यास त्या ठिकाणी भाजपचा उमेदवार निवडून येऊ शकतो. 
महादेव जानकर म्हणाले, 2014 साली बारामती लोकसभा मतदारसंघातून मी निवडणूक लढवली होती. मी फक्त आठ दिवस तयारी केली होती. तेव्हा सुप्रिया सुळे 34 हजार मतांनी निवडून आल्या. मला जर निवडणुकीच्या तयारीसाठी एक महिना मिळाला असता तर विजय मिळवला असता. सुप्रिया सुळे या शरद पवारांच्या कन्या आहेत. मात्र, जनतेने ठरवलं तर त्यांना हरवलं काय अवघड नाही, असं मत महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी व्यक्त केले.

महादेव जानकर म्हणाले, बारामती हा पवारांसाठी अभेद्यकीला राहिला आहे. परंतु बारामती जिंकायची असेल तर भाजपने काय केलं पाहिजे याची स्ट्रॅटेजी देखील महादेव जानकर यांनी ठरवली. केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन जर बारामतीत येणार असतील तर त्यांचा स्वागत आहे. अशी प्रतिक्रिया महादेव जानकर यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.