Maharashtra Corona Update : राज्यात आज 48,270 नवे कोरोना रुग्ण, 144 ओमायक्रॉन बाधित

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात आज (शुक्रवारी ) 48,270 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, त्यापैकी 144 ओमायक्रॉन बाधित रुग्ण आहेत.

आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 74 लाख 20 हजार 027 एवढी झाली आहे. त्यापैकी 70 लाख 09 हजार 823 जण बरे झाले आहेत. आज 42,391 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्याचा रिकव्हरी रेट 94.47 टक्के एवढा आहे.

सध्याच्या घडीला राज्यात 2 लाख 64 हजार 388 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात आज 52 जणांचा मृत्यू झाला आहे. आजवर 1 लाख 42 हजार 023 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्याचा कोरोना मृत्यूदर 1.91 टक्के एवढा आहे. राज्यात आजवर 7 कोटी 29 लाख 51 हजार 286 प्रयोगशाळा नमुने तपासण्यात आले आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.