Pune Crime News : धक्कादायक! 32 वर्षीय महिलेवर आठ जणांकडून बलात्कार

एमपीसी न्यूज – पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका 32 वर्षीय विवाहितेवर 8 जणांनी बलात्कार केला. या महिलेने तक्रार दिल्यानंतर शिरूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आठ जणांना अटक केली आहे. माऊली पवार , रज्जाक पठाण, काळु वाकुंज, विठ्ठल काळे, राजेश उर्फ पप्पु गायकवाड, आकाश गायकवाड, संदीप वाळुंज नवनाथ वाळुंज अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, काही दिवसांपूर्वी या महिलेच्या पतीचे निधन झाले. त्यामुळे त्या एकट्याच राहत होत्या. याचाच फायदा घेऊन वरील आरोपीने मागील वर्षी एप्रिल ते मे या कालावधीत तिच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी एक एकट्याने घेऊन जात बलात्कार केला आहे. दरम्यान या सर्व प्रकाराला कंटाळून फिर्यादी महिलेने पोलिसात धाव घेतली. शिरूर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून पाच आरोपींना अटक केली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.