Pune Corona Update : पुण्याला कोरोनाचा विळखा! दिवसभरात नवीन 8 हजार 301 रुग्णांची नोंद; 4 जणांचा मृत्यू

एमपीसी न्यूज – पुणे शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत आज कमालीची वाढ पाहायला मिळाली. शहराच्या विविध भागातील 8 हजार 301  नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (शुक्रवारी) नोंद झाली. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 5 हजार 480 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

कोरोनामुळे शहरातील चार रुग्णांचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 9 हजार 172 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 5 लाख 91 हजार 834 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 45 हजार 081 सक्रिय रुग्ण शहरात आहेत, यामध्ये आज दिवसभरात 8 हजार 301 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नव्याने नोंद झाली.

तर, शहरात आज दिवसभरात 20 हजार 338 नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली. आजपर्यंत 42 लाख 105 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.

शहरात कोरोना रुग्णवाढीचा आलेख कमालीचा चढताच पाहायला मिळत आहे, त्यामुळे नागरिकांनी स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.