Maharashtra Corona Update : राज्यात आज 807 नव्या कोरोना रूग्णांची नोंद, 869 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात आज (शनिवारी) दिवसभरात राज्यात 807 नव्या रुग्णांची नोंद झाली असून, 869 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या राज्यात 6 हजार 452 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 66 लाख 43 हजार 179 एवढी झाली आहे. त्यापैकी 64 लाख 91 हजार 805 जण उपचारानंतर बरे झाले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट वाढून 97.72 टक्के एवढा झाला आहे.

राज्यात आज 20 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यासह राज्यातील एकूण कोरोना मृतांची संख्या 1 लाख 41 हजार 243 एवढी झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे.

सध्या 75 हजार 095 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 865 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 67 लाख 59 हजार 668 प्रयोगशाळा नमुने तपासण्यात आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.