Maharashtra Corona Update : मोठा दिलासा! तब्बल दोन वर्षांनंतर कोरोना रुग्ण संख्या शंभरच्या आत

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात नव्यानं वाढ होणा-या दैनंदिन कोरोना रुग्ण संख्येत मोठी घट होताना दिसत आहे. आज (शनिवारी) दिवसभरात 97 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. एप्रिल 2020 म्हणजे जवळपास दोन वर्षानंतर राज्यातील दैनंदिन रुग्ण वाढ शंभरच्या आत आली आहे. राज्यातील नागरिकांसाठी ही मोठी दिलासादायक बाब आहे.

आरोग्य विभागाच्या आकडेवारी नुसार, आजवर 78 लाख 72 हजार 300 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी 77 लाख 23 हजार 005 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आज दिवसभरात 251 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्याचा रिकव्हरी रेट 98.10 टक्के आहे.

 

राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या कमी झाली असून, सध्या 1,525 ॲक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात आजवर 1 लाख 43 हजार 766 जण मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा मृत्यूदर 1.82 टक्के एवढा आहे. आजपर्यंत 7 कोटी 89 लाख 09 हजार 115 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.

पुण्यात सर्वाधिक ॲक्टिव्ह रुग्ण

राज्यात पुण्यात 518 सक्रीय रुग्ण आहेत. तर मुंबईत 315, ठाणे 166, अहमदनगरमध्ये 144 सक्रीय रुग्ण आहेत. धुळे, हिंगोली, यवतमाळमध्ये एकही सक्रीय रुग्ण नाही. तर पालघर 9, रन्नागिरी 4, सांगली 7, जळगाव 4, नंदूरबार 1, जालना 1, परभणी 9, नांदेड 9, उस्मनाबाद 6, अमरावती 4, अकोला 3, वाशिवाम 3. वर्धा 1, भंडारा 1 चंगद्रपूर 3 आणि गडचिरोलीमध्ये सात ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.