Maharashtra Corona : राज्यात गुरुवारी चार हजारांपेक्षा अधिक रुग्णांची वाढ

एमपीसी न्यूज – जूनच्या पहिल्या आठवड्यापासून राज्यातील कोरोना (Maharashtra Corona)  रुग्णांची संख्या वाढत आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आजही राज्यात कोरोना रुग्णांची संख्या चार हजारांच्या पुढे आहे.

 

Music Academy : संगीत अकादमीच्या नावाखाली होणारी अनावश्यक उधळपट्टी थांबवा – अमित गोरखे

ओमायक्रॉन  आणि त्याचा सब व्हेरियंटच्या रुग्णांमुळे राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दरम्यान,राज्यात आज तीन कोरोना (Maharashtra Corona) बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. सध्या राज्यातील मृत्यूदर १.८६ टक्के आहे.

 

PDFA LEAGUE : जाएंटस, घोरपडी तमिळ युनायटेड प्रथम श्रेणीत

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, राज्यात गुरुवारी चार हजार २५५ नवीन कोरोना (Maharashtra Corona) रुग्णांची नोंद झाली. बुधवारी राज्यात ४०२४ रुग्ण आढळले होते. त्यातुलनेत आज राज्यातील कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाली. दिलासादायक बाब म्हणजे, गेल्या २४ तासांत २८७९ रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे राज्यातील कोरोनामुक्तांची संख्या ७७ लाख ५५ हजार १८३ इतकी झाली आहे.तर रुग्ण बरे होण्याचं प्रमाण आहे. ऍक्टिव्ह रुग्णसंख्या २० हजारांच्या पार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.