Music Academy : संगीत अकादमीच्या नावाखाली होणारी अनावश्यक उधळपट्टी थांबवा – अमित गोरखे

एमपीसी न्यूज  – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (Music Academy) माध्यमातून निगडी येथील संगीत अकादमीच्या नुतनीकरणाच्या नावाखाली तब्बल साडेतीन कोटी रुपयांची उधळपट्टी करण्यात येत आहे. भाजपच्या सत्ताकाळात कोणत्याही कामांवरून बोंब मारणारे मंडळी या उधळपट्टीवरून मौन बाळगून आहेत. मात्र, प्रशासनाने तातडीने संगीत अकादमीच्या नावावर होणारी उधळपट्टी थांबवावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टी प्रदेश सचिव तथा कलारंग संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अमित गोरखे यांनी केली आहे.

यासंदर्भात गोरखे यांनी महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यात गोरखे यांनी म्हटले आहे की, महापालिकेच्या माध्यमातून ‘अ’ प्रभाग कार्यालयाअंतर्गंत निगडी येथील संगीत अकादमीचे स्थापत्यविषयक व सुधारणांची कामे करण्यासाठी निविदा काढण्यात आली आहे. या निविदेची 3, 37, 51, 164 रुपये इतका खर्च या कामावर करण्यात येणार आहे.

मागील 20 वर्षा पेक्षा जास्त वर्षापासून पिंपरी-चिंचवड शहरात शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत आहे. या कामाची निविदा पाहिल्यानंतर मला आश्चर्य वाटले आहे. आयुक्त म्हणून आपण या संगीत अकादमीची जागा पहावी. ती महानगरपालिकेच्या संत तुकाराम महाराज व्यापारी संकुलाच्या सगळ्यात शेवटच्या मजल्यावर आहे. सुमारे 8 हजार स्क्वेअर फूट जागेत ही अकादमी आहे. या ठिकाणी असलेल्या या अकादमीचे नुतनीकरण करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च महापालिका (Music Academy) करत आहे.

Devendra Fadanvis : बारामती, मावळ येथे ताकद वाढवा; फडणवीसांच्या सूचना; लोकसभेच्या ४५ जागांसाठी योजना

त्यामुळे महापालिकेच्या आणि प्रशासनाच्या कारभाराविषयी आणि संकुचित सांस्कृतिक धोरणाविषयी अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. ही जागा त्यावेळी तात्पुरती सोय म्हणून तेथे संगीत अकादमी सुरू केलेली आहे. शहराला मोठ्या संगीत अकादमीची आवश्यकता आहे. या जुन्या जागेसाटी सुमारे साडेतीन कोटी रुपये खर्च केले जात आहेत. त्याऐवजी निगडी प्राधिकरण परिसरात नवीन नाट्यगृह होत आहे. त्या आवारात नवीन संगीत अकादमीसाठी खर्च केल्यास ते योग्य राहील. तसेच, ती संगीत अकादमी खऱ्या अर्थाने शहराला शोभा देणारी ठरेल. त्यामुळे महानगरपालिकेचा होणारा खर्च वाचणार आहे, असे गोरखे यांनी नमूद केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.