Maharashtra Corona Update : राज्यात आज 2,840 नवे रुग्ण ; 5,123 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – राज्यात आज 2 हजार 840 नव्या रुग्णांचं निदान झाले, तर 68 रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. मागील 24 तासांत 5 हजार 123 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. महाराष्ट्रात कोरोना संसर्ग झालेले एकूण 16 लाख 23 हजार 503 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

आज महाराष्ट्रात 2 हजार 840 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे कोरोना बाधितांची एकूण संख्या 17 लाख 52 हजार 509 इतकी झाली आहे. राज्यात सध्या 81 हजार 925 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक असून, राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 92.64 टक्के इतकं झालं आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

आज पर्यंत तपासण्यात आलेल्या 98 लाख 47 लाख 478 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 17 लाख 52 हजार 509 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 7 लाख 91 हजार 10 व्यक्ती होमक्वारंटाइन आहेत तर 5 हजार 367 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.

देशासह राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. मागील महिनाभरापासून नव्यानं वाढ होणा-या रुग्णांपेक्षा बरे होणा-या रुग्णांची संख्या वाढली असून राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या कमी झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.