Maharashtra Corona Update : महाराष्ट्रात आज 33,159 अ‍ॅक्टिव्ह कोरोना रुग्ण

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात आज (मंगळवारी) 2 हजार 401 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून, 2 हजार 840 बरे झालेल्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील अ‍ॅक्टिव्ह कोरोना रूग्णसंख्या कमी झाली असून, आज घडीला 33 हजार 159 अ‍ॅक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 65 लाख 64 हजार 915 एवढी झाली आहे. त्यापैकी 63 लाख 88 हजार 899 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट वाढून 97.32 टक्के एवढा झाला आहे.

राज्यात आज 39 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून, आजवर 1 लाख 39 हजार 272 जण कोरोनामुळे दगावले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.12 टक्के एवढा आहे.

महाराष्ट्रात आजवर 5 कोटी 94 लाख 69 हजार 053 चाचण्या पार पडल्या आहेत. सध्या राज्यात 1 हजार 338 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत तर, 2 लाख 40 हजार 052 जण होम क्वारंटाईन आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.