Maharashtra Corona Update : राज्यात 35 हजार सक्रिय रूग्ण, दिवसभरात 3,451 नवे रुग्ण

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात आज दिवसभरात 3 हजार 451 कोरोना रुग्णांची नव्यानं वाढ झाली असून, 35 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच, दिवसभरात 2 हजार 421 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या राज्यात 35 हजार 633 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात आज झालेल्या वाढीमुळे राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 20 लाख 52 हजार 253 एवढी झाली आहे. त्यापैकी 19 लाख 63 हजार 946 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

राज्यात आज 30 रुग्ण दगावले असून आतापर्यंत राज्यात 51 हजार 390 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.50 टक्के एवढा आहे. राज्याचा कोरोना रिकव्हरी रेट 95.74 टक्के एवढा झाला आहे. राज्यात सध्या 1 लाख 65 हजार 992 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 1 हजार 852 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.