Maharashtra Corona Update : आज 525 कोरोना रुग्णांची नोंद, 206 ओमायक्रॉन बाधित

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात आज दिवसभरात 525 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे, त्यापैकी 206 रुग्ण हे ओमायक्रॉन बाधित आहेत. आज दिवसभरात 992 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 
आरोग्य विभागाच्या आकडेवारी नुसार, राज्यात आतापर्यंत 77 लाख 15 हजार 711 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.07 टक्के आहे.  राज्यात सध्याच्या घडीला 4,476 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

राज्यात आज 9 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.82 टक्के झाला आहे. सध्या राज्यात 28,878 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 595 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आजपर्यंत 7 कोटी 81 लाख 38 हजार 182 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
ओमायक्रॉन अपडेट
महाराष्ट्रात आज 206 नवीन ओमायक्रॉन बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंत 5211 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 4629 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे. सध्या राज्यात 582 ओमायक्रॉनचे रुग्ण ॲक्टिव्ह आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.