Maharashtra Corona Update : राज्यात 9,170 नवे कोरोना रुग्ण, मुंबईत 6,347 रुग्णांची नोंद

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची पुन्हा झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. वर्षाच्या शेवटच्या दिवशी राज्यात 8 हजार 067 रुग्णांची वाढ झाल्यानंतर, आज (शनिवारी) 9 हजार 170 रुग्ण वाढले असून, त्यापैकी 6 हजार 347 रुग्ण मुंबई मधील आहेत. तसेच आज राज्यात 06 ओमायक्रॉन बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. सहाही रुग्ण पुणे जिल्ह्यातील आहेत.

 

आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 66 लाख 87 हजार 991 एवढी झाली आहे. त्यापैकी 65 लाख 10 हजार 541 जण उपचारानंतर बरे झाले आहेत. आज 1,445 बरे झालेल्यांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्याचा रिकव्हरी रेट 97.35 टक्के एवढा झाला आहे.

 

राज्यातील ॲक्टिव्ह रुग्णसंख्या पुन्हा वाढली असून, सध्या 32 हजार 225 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज दिवसभरात 7 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.11 टक्के एवढा आहे. राज्यात सध्या 2 लाख 26 हजार 001 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 1,064 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

 

पुण्यात जिल्ह्यात सहा ओमायक्रॉन बाधित रुग्णांची नोंद

राज्यात आज सहा नव्या ओमायक्रॉन बाधित रुग्णांची नोंद झाली असून, ते सर्व रुग्ण पुणे जिल्ह्यातील आहेत. त्यापैकी 3 पुणे ग्रामीण, दोन पिंपरी चिंचवडमध्ये आणि पुणे महानगरपालिका हद्दीत एका रुग्णाची नोंद झाली आहे. राज्यात आजवर 460 ओमायक्रॉन बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 180 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. तर, एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.