Maharashtra Corona Update : राज्यात आज 17,323 जण कोरोनामुक्त, रिकव्हरी रेट 81.63 टक्क्यांवर

एमपीसी न्यूज – राज्यात आज दिवसभरात 17 हजार 323 जण कोरोनामुक्त झाले.  मागील काही दिवसांपासून राज्यात नव्या रुग्णापेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. आज दिवसभरात राज्यात 12 हजार 134 नवे रुग्णांची नोंद झाली असून 302 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्य आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 15 लाख 6 हजार 18 एवढी झाली आहे. त्यापैकी 12 लाख 29 हजार 339 जण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात सध्या 2 लाख 36 हजार 491 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

राज्यात आज दिवसभरात 302 रुग्णांचा मृत्यू झाला असून, राज्यातील मृत्यूदर 2.64 टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 74 लाख 87 हजार 383 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 15 लाख 06 हजार 018 (20.11) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

सध्या राज्यात 23 लाख 588 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत, तर 24 हजार 972 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

कोरोनाव्हायरसवर विविध औषधांनी उपचार केले जात आहे. लशींचं क्लिनिकल ट्रायल सुरू आहे. शिवाय प्लाझ्मा थेरेपीचाही वापर करण्यात आला, ज्यामध्ये कोरोनामुक्त रुग्णांचे प्लाझ्मा कोरोनाग्रस्तांना देण्यात आले.

मात्र,  ही प्लाझ्मा थेरेपी फारशी प्रभावी नसल्याचं इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने स्पष्ट केलं आहे.

आयसीएमआर आणि हैदराबादमधील बायोलॉजिकल ई. लिमिटेड फार्मास्युटिकल कंपनीने मिळून एक अँटिसेरा विकसित केलं आहे. ज्याच्या मानवी चाचणीला मंजुरी मिळाली आहे. आता लवरकरच हे क्लिनिकल ट्रायल सुरू केलं जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.