Maharashtra Corona Update : राज्यात आज 62,097 नवे रुग्ण; 54,224 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – राज्यात आज दिवसभरात तब्बल 62 हजार 097 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून, 54 हजार 224 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आज 519 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आरोग्य विभागाच्या हवाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 39 लाख 60 हजार 359 वर जाऊन पोहोचली आहे. त्यापैकी 32 लाख 13 हजार 464 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.

आज 54 हजार 224 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 81.14 टक्के एवढं झाले आहे.

_MPC_DIR_MPU_II

चिंताजनक बाब म्हणजे राज्यात सध्या 6 लाख 83 हजार 856 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशातील सर्वाधिक सक्रिय रुग्ण महाराष्ट्रात आहेत. आज 519 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला, आजवर एकूण 61 हजार 343 जण कोरोनामुक्त मुत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 1.55 टक्के एवढा आहे.

सध्या राज्यात 38 लाख 76 हजार 998 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 27 हजार 690 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आतापर्यंत 2 कोटी 43 लाख 41 हजार 736 नमूने तपासण्यात आले आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.