Maharashtra Corona Update : राज्यात आज 2,432 नवे कोरोना रुग्ण, 2,895 जणांना डिस्चार्ज 

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात आज (सोमवारी) 2 हजार 432 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली तर, 2 हजार 895 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या कमी झाली असून, सध्या 37 हजार 036 ॲक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

राज्यातील एकूण कोरोना बाधित रूग्णांची एकूण संख्या 65 लाख 41 हजार 762 झाली आहे. त्यापैकी आजपर्यंत एकूण 63 लाख 62 हजार 248 कोरोना रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) 97.26 टक्के एवढे झाले आहे.

राज्यात आज 32 कोरोना बाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत 1 लाख 38 हजार 902 कोरोना बाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्के एवढा आहे.

राज्यात आजपर्यंत 5 कोटी 82 लाख 86 हजार 036 प्रयोगशाळा नमुने तपासण्यात आले आहेत. सध्या राज्यात 2 लाख 57 हजार 144 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत, तर 1 हजार 517 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.