Maharashtra Corona Update : राज्यात आज 999 नवे कोरोना रुग्ण, 1,020 जणांना डिस्चार्ज 

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रात आज (शनिवारी) 999 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून, 1,020 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या राज्यात 12 हजार 219 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रूग्णांची संख्या 66 लाख 23 हजार 344 एवढी झाली आहे. त्यापैकी 64 लाख 66 हजार 913 रूग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट वाढून 97.64 टक्के झाला आहे.

आज राज्यात 49 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून आजवर 1 लाख 40 हजार 565 जण कोरोनामुळे दगावले आहेत तर, राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के एवढा आहे.

महाराष्ट्रात आतापर्यंत 6 कोटी 38 लाख 63 हजार 284 नमूने तपासण्यात आले आहेत. सध्या राज्यात 1 हजार 028 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत तर, 1 लाख 19 हजार 432 जण होम क्वारंटाईन आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.