Maharashtra Corona Update : राज्यात रुग्ण संख्या स्थिरावतेय !  आज 63,282 नवे रुग्ण

एमपीसी न्यूज – राज्यातील रुग्ण संख्या 60 हजारांवर स्थिरावली असून, मागील काही दिवसांपासून 60 ते 65 हजारांच्या आसपास रुग्णवाढ होत आहे. राज्यात आज दिवसभरात 63 हजार 282 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून, 802 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आरोग्य विभागाच्या हावाल्याने एएनआयने याबाबत आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 46 लाख 65 हजार 754 वर जाऊन पोहोचली आहे. त्यापैकी 39 लाख 30 हजार 202 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात 61 हजार 326 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

सध्या राज्यात 6 लाख 63 हजार 758 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज 802 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला, आजवर एकूण 69 हजार 615 जण कोरोनामुक्त मुत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 1.50 टक्के एवढा आहे. राज्याचा रिकव्हरी रेट सध्या 84.24 टक्क्यांवर पोहोचला आहे.

सध्या राज्यात 40 लाख 43 हजार 899 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 26 हजार 420 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आतापर्यंत 2 कोटी 73 लाख 95 हजार 288 नमूने तपासण्यात आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.