Maharashtra Politics : अजित पवार शपथ वेळी उत्सुकतेच्या नादात विसरले राज्यपालांना!

एमपीसी न्यूज : महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) पुन्हा एकदा मोठा भूकंप घडला. शरद पवार यांचे विश्वासू आणि जवळची व्यक्ती अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवार तीन वर्षात तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्री झाले. पण शपथ घेतेवेळी एकच हशा पिकला.

कारण शपथ घेताना अजित पवार यांनी उत्सुकतेमध्ये राज्यपाल रमेश बैस यांच्या आधीच शपथ घेतो म्हंटले, अन सर्वजण हसू लागले. त्यावेळी ते भानावर आले अन मग राज्यपालांनी त्यांना शपथ दिली.

आज सकाळी देवगिरी बंगल्यावर अजित पवार यांनी मंत्र्यांसमवेत बैठक घेतली. अन अचानक काही तासांतच राज्याची सूत्र बदलली. अजूनही शरद पवार यांची काहीही प्रतिक्रिया मिळाली नाही. शरद पवार यावर विरोधात भूमिका घेणार का? हा माझाच खेळ असल्याचे वक्तव्य शरद पवार करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. या निर्णयाने मात्र उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना मोठा धक्का मिळाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.