Maharashtra State Update : दिलासादायक! राज्यात पहिल्यांदाच नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक

Comfortable! For the first time in the state, the number of coronaviruses is higher than new patients : आज 8,706 रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर 7,924 नवीन रुग्णांचे निदान झाले

एमपीसी न्यूज – राज्यात आज  प्रथमच कोरोनाच्या नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त नोंदविली गेली.  आज 8,706 रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर 7,924 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.

राज्यातल्या कोरोना बाधितांची एकूण संख्या 3,83,723 एवढी झाली आहे. राज्यात आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 2,21,944 झाली आहे. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 57.84 टक्के आहे.

सध्या 1,47,592  रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात आज 227 मृत्यूंची नोंद झाली, तर  आत्तापर्यंत 13,883 जणांचा मृत्यू झाला.

20 ऑगष्टपर्यंत पुण्यातील कोरोना बाधितांची संख्या 1 लाखांवर जाऊ शकते, त्यापैकी 48 हजार पेशंट्स अँक्टिव्ह असू शकतात, असा अंदाज पुणे मनपाच्या अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनी  व्यक्त केला.

“सध्याच्या रूग्णवाढीनुसार 31 जुलैपर्यंत पुण्यातील कोरोना बाधितांचा आकडा 60 हजारांवर जाण्याचा अंदाज आहे. त्यापैकी 27 हजार पेशंट्स अँक्टिव्ह असू शकतात, हा अंदाज  पुणे मनपाने  व्यक्त केला.

बाहेरून येणाऱ्या रूग्णांची संख्या 10 टक्क्यांपेक्षा अधिक असल्याने 20 ऑगष्टपर्यंत पुण्यातील कोरोना बाधितांचा आकडा 1 लाखांचा टप्पा करू शकते पार करू शकतो,  असेही त्यांनी सांगितले.

पुण्यात आत्तापर्यंत 40931 रॅपिड अँन्टीजेन टेस्ट करण्यात आल्या. त्यापैकी 8363 पेशंट्स पॉझिटिव्ह निघाले. पुणे मनपा 1 लाख रॅपिड अँटीजेन टेस्ट करणार आहे.

आतापर्यंत झालेल्या 19,25399 चाचण्यांपैकी  3,83,723 (19.92 टक्के) चाचण्या कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 9,22,637 व्यक्ती होमक्वारंटाईन आहेत तर 44,136 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.