Alandi : आळंदीमध्ये महात्मा गांधी यांना पुण्यतिथी निमित्त आंदराजली

एमपीसी न्यूज : आज आळंदी येथील इंद्रायणी घाटावर राष्ट्रपिता (Alandi) महात्मा गांधी पुण्यतिथी निमित्त महात्मा गांधी यांचे रक्षा विसर्जन स्थळ स्मारक येथे महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार व पुष्प अर्पण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. तसेच आज 30 जानेवारी हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो. यावेळी हुतात्म्यांचे कार्याचे स्मरण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

Chinchwad : सोशल मीडियावरूनही होताहेत विनयभंग; वर्षभरात 359 गुन्ह्यांची नोंद

आळंदी येथील काँग्रेस, राष्ट्रवादी कॉग्रेस, इंद्रायणी सेवा फाउंडेशन,जनहित फाउंडेशनचे पदाधिकारी , विविध संस्था व नागरिक यांनी महात्मा गांधी पुण्यतिथी निमित्त त्यांनी महात्मा गांधीस आंदराजली व हुतात्मा दिना निमित्त हुतात्म्यांस अभिवादन केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.