Sangvi Crime News : मुदतीत कर्जाची परतफेड न केल्याने एकास मारहाण; दोघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – मुदतीत कर्जाची फेड न केल्याने दोघांनी मिळून एकास मारहाण केली. ही घटना 24 मार्च ते 10 ऑक्टोबर या कालावधीत नवी सांगवी येथे घडली.

मोहिनी लोहार, संतोष काकडे (दोघे रा. जुनी सांगवी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी धीरज शामसुंदर शर्मा (वय 35, रा. पिंपळे गुरव) यांनी बुधवारी (दि. 13) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी आरोपींकडून साडेबारा टक्के व्याजाने व कर्जाची रक्कम 50 दिवसात दररोज देण्याच्या अटीवर, प्रोसेसिंग फी व एका दिवसाची रक्कम कपात करून दोन लाख 40 हजार रुपये फोनपेद्वारे कर्ज घेतले. 10 ऑक्टोबरपर्यंत कर्ज फेड करण्याची मुदत होती. मात्र फिर्यादी मुदतीत कर्जफेड करू शकले नाहीत.

त्यामुळे आरोपी संतोष याने फिर्यादी यांना घरी येऊन शिवीगाळ व हाताने मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच आरोपी मोहिनी हिने फोनवरून ‘मला आजच्या आज पैसे पाहिजेत. तू तुझ्या आई-बापाकडून घे. कोणाला तरी विकून पैसे घे’ तसेच अश्लील बोलून पैसे मागितले. याप्रकरणी सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.