Chinchwad News : धारदार शस्त्राने वार करुन इसमचा खून

एमपीसी न्यूज – धारदार शस्त्राने वार करुन इसमचा खून केला आहे. अज्ञात इसमाने फोन करून बाहेर बोलवले व शरीरावर ठिकठिकाणी वार करत खून केला आहे. कृष्णा हॉटेल पाठिमागे, वाल्हेकरवाडी येथे शनिवारी (दि.05) रात्री साडे दहाच्या सुमारास हा प्रकार घडला.

ज्ञानदेव श्रीरंग साठे (रा. चिंचवडेनगर, वाल्हेकर वाडी) असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे.

याप्रकरणी रोहीणी गोकुळ गायकवाड (वय 25, रा. चिंचवडेनगर, वाल्हेकर वाडी) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्ञानदेव साठे यांना शनिवारी (दि.05) रात्री साडे दहाच्या सुमारास अज्ञात इसमाने कृष्णा हॉटेलच्या मागे बोलावून घेतले. साठे यांच्या शरीरावर ठिकठिकाणी धारदार शस्त्राने वार करुन त्यांना रक्तबंबाळ केले, यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. चिंचवड पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.