Thergaon Crime News : थेरगाव येथे जमावाची तिघांना मारहाण

एमपीसी न्यूज – मैत्रिणीच्या कारणावरून झालेल्या वादाचा राग मनात धरून वाकड येथील एका मुलासह त्याचे वडील आणि मित्राला सात ते आठ जणांच्या जमावाने मारहाण करून, गंभीर दुखापत केली आहे. हि घटना थेरगाव येथील श्रीनगर फाटा व जयमल्हार कॉलनीजवळ बुधवार (दि. 2) रोजी रात्री आठ ते नऊच्या दरम्यान घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सविता संदिप तरडे राहणार तापकीर चौक, काळेवाडी यांचा मुलगा प्रेम तरडे याच्या मैत्रिणीच्या कारणावरून झालेल्या वादाचा राग मनात धरून प्रेम आणि त्याचा मित्र महेश पलमट्टे यास आरोपी क्रिश वय 19, क्रिशची बहिण मोना वय 20, सौरव गुंजाळ वय 19, राहित गोयर वय 21 सर्व काळेवाडी येथील आरोपींनी रात्री आठच्या सुमारास श्रीनगर फाटा येथे लाथा बुक्यांनी मारहाण केली. यामध्ये आरोपी सौरव याने महेशच्या हातावर धारधार शस्त्राने गंभीर दुखापत केली.

यानंतर भांडणे मिटविण्यासाठी गेलेले प्रेमचे वडिल संदीप तरडे, प्रेम व मित्र महेश यांस पुन्हा त्या आठ आरोपींनी रात्री 9 वाजता जय मल्हार कॉलनीजवळ वाद घालून, मारहाण केली. आरोपी सौरभ याने पुन्हा महेशला बांबूने मारहाण केली आणि सर्वांना शिवीगाळ केली. याविरोधात सविता संदिप तरडे यांनी वाकड पोलीस स्टेशनमध्ये शनिवार (दि. 5) रोजी सायंकाळी सव्वा पाच वाजता फिर्याद दिली आहे.

सदर घटनेचा तपास वाकड ठाण्याचे सह पोलीस निरिक्षक लोहार करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.