Manisha Rathod : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार मनीषा राठोड यांचा सत्कार

एमपीसी न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माध्यमिक विद्यालय थेरगाव शाळेचे मुख्याध्यापक चंद्रशेखर कदम यांनी आज मनीषा राठोड (Manisha Rathod) ही शाळेची विद्यार्थिनी असल्याने शाळेच्या सभागृहात सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता.

या प्रसंगी आपल्या स्वागतपर भाषणामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकाच्या क्रीडा विभागाच्या सहाय्यक आयुक्त सुषमा शिंदे यांनी मनीषा राठोड हिने चौथ्या ‘खेलो इंडिया हरियाणा पंचकूला’ येथील स्पर्धेत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे प्रतिनिधित्व करत महाराष्ट्र संघाला ‘रौप्य पदक’ मिळवून दिल्याबद्दल सत्कार समारंभ प्रसंगी मनोगतात म्हंटले, की “अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे साहेब यांच्या सूचनेप्रमाणे उद्या दिनांक 11 जून 2022 शनिवार रोजी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते महापालिकेच्या वतीने महापालिकेच्या दालनात भव्य सत्कार करण्यात येणार असल्याची जाहीर केले”.

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी स्पेशल डिझायनर तुकाराम पगडी

या प्रसंगी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी तथा उपआयुक्त संदीप खोत, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले. तर, प्रमुख पाहुणे म्हणून अनिता केदारी, क्रीडा अधिकारी पिंपरी चिंचवड मनपा, गट्टूवार देवान्ना कार्यकारी अभियंता ‘ग’, वाघ स्नेहल, जेष्ठ अभियंता, बोरुडे मिठ्ठू मुख्य लिपिक माध्यमिक शिक्षण विभाग, कालिदास लांडगे सामाजिक कार्यकर्ते कुस्ती कोच, लक्ष्‍मी कर्डिले हे उपस्थित होते.

मनीषा राठोडसह (Manisha Rathod) महाराष्ट्र संघाच्या सह व्यवस्थापिका म्हणून सोनाली जाधव यांची या स्पर्धेसाठी महाराष्ट्र सरकारने नेमणूक झाली होती. त्यांचा या प्रसंगी यथोचित सत्कार करण्यात आला. मनीषाला आटवे बी.जी. क्रीडा मार्गदर्शक यांचे मार्गदर्शन लाभले असून सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माध्यमिक विद्यालयाचे पर्यवेक्षक रामेश्वर पवार यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.