Hinjawadi News: शिविगाळ केल्याचा जाब विचारल्याने गालावर मारला ब्लेड

एमपीसी न्यूज – काहीही कारण नसताना शिविगाळ केल्याचा (Hinjawadi News) जाब विचारला म्हणून एकाच्या गालावर ब्लेड मारुन गंभीर जखमी केले. ही घटना गुरूवारी (दि. 9 जून) रात्री साडेआठच्या सुमारास बावधन येथे घडली.

याबाबत रविंद्र अर्जुन चव्हाण (वय 46, रा. सुतारवाडी, पाषाण) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तानाजी खरात (रा. बावधन) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mhada Lottery : म्हाडाच्या घरांबाबत राज्य सरकारने केला नियमात बदल

आरोपीने तानाजी याने फिर्यादी (Hinjawadi News) रविंद्र यांना काही एक कारण नसताना शिविगाळ केली. याचा जाब फिर्यादी रविंद्र यांनी आरोपी तानाजी याला विचारला असता आरोपीने फिर्यादी यांच्या डाव्या गालावर ब्लेड मारले. यामध्ये फिर्यादी गंभीर जखमी झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.