Maval : प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे श्रमसंस्कार शिबिर डोणे गावांमध्ये संपन्न

एमपीसी न्यूज – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभाग व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालय यांच्या संयुक्तपणे सोमवार दि. १६ ते २२  डिसेंबर या कालावधीत मावळ तालुक्यातील डोणे या गावी सात दिवसीय निवासी श्रमसंस्कार शिबिर संपन्न झाले. या शिबिरात सुमारे 175 विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला.

या श्रमसंस्कार शिबिराचा समारोप दि. २२ डिसेंबर रोजी संपन्न झाला. या समारोप समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मावळ पंचायत समितीच्या सभापती सुवर्णाताई कुंभार, उपसभापती जिजाबाई पोटफोडे, जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे, पंचायत समिती सदस्य नितीन घोटकुले, पवन मावळ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष चंद्रकांत चांदेकर तसेच डोणे गावच्या सरपंच सारिका शिवलिंग कुंभार, उपसरपंच सुलभा पोपट वाडेकर, ग्रामसेविका अर्चना पाटोळे, मुख्याध्यापक जि. प. प्राथमिक शाळा मरीबा घोलप, तसेच  विलास खिलारी,  अशोक कारके  आणि सामाजिक कार्यकर्ते व एकता प्रतिष्ठान, डोणेचे संस्थापक, बाळासाहेब घारे, पोपट वाडेकर, शिवलिंग कुंभार, राहुल घारे, श्रीरंग खिलारी, काळुराम घारे, नामदेव सुतार, संतोष कुंभार, संतोष लांडगे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना नितीन मराठे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी दूरदृष्टी ठेवावी, आपली ध्येये मोठी असावीत. या शिबिरामध्ये ग्रामीण नियोजनाचा अभ्यास करावा. तसेच रा.से.यो. हे विद्यार्थ्यांना मिळालेले हक्काचे व्यासपीठ आहे, येथे आपल्या कलागुणांना वाव मिळतो. नितीन घोटकुले यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना कोणत्या क्षेत्रात आवड आहे, हे जाणून घेतले. तसेच त्यांनी आधुनिक शेती करावी असे आवाहन केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. पोपट तांबडे यांनी ग्रामस्थांना विद्यार्थ्यांनी केलेली स्वच्छता अशीच टिकून ठेवावी, असे आवाहन केले व ग्रामस्थांच्या सहकार्याबद्दल ऋण व्यक्त केले. समारोप समारंभाच्या प्रास्ताविकामध्ये कार्यक्रम अधिकारी प्रा. रामदास लाड यांनी शिबिरातील कामाचा आढावा घेतला. यामध्ये विशेष श्रमसंस्कार शिबिरांमध्ये एक पन्नास फुटी सुगी बंधारा बांधण्यात आला व दोन ठिकाणी पाणी अडविण्यासाठी बांध बांधण्यात आले. तसेच ग्रामस्वच्छता, आरोग्य, जनजागृती, प्रबोधनपर पथनाट्य तसेच गावचे सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक व राजकीय सर्वेक्षण, पाणी – माती परीक्षण, ऊर्जा- पशु- वनस्पती यांचे सर्वेक्षण करण्यात आले.

स्वयंसेवकांनी गावातील रस्ता, गटार व परिसर सफाई केली गावातील ग्रामपंचायत, प्राथमिक शाळेच्या आवारात सफाई केली. गावातील विठ्ठल-रुक्माई मंदिर, डोणुबाई मंदिर आदी परिसर स्वच्छ केले. गावातील लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी पथनाट्य, शाळेतील विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिमत्व विकास, अन्नपदार्थांतील भेसळ ओळखणे इत्यादी विषयाबाबत तज्ञ अध्यापकांची व्याख्याने, वैश्विक शांततेसाठी रा.से. यो. ची आवश्यकता, प्रेरणा युवकांसाठी, जीआयएस मॅपिंग, सक्षम युवा आणि मानसिक आरोग्य अशा विविध विषयावरती व्याख्याने आयोजित करून ग्रामस्थांसाठी भारुड, स्वच्छता विषयक जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले.

या शिबिराचे सर्व नियोजन कार्यक्रम अधिकारी प्रा. रामदास लाड, डॉ. मधुकर राठोड, डॉ. सारिका मोहोळ दत्तात्रय भांगे यांनी प्रभारी प्राचार्य अभय खंडागळे यांच्या मार्गदर्शनाखाली केले तर सहकारी प्रा कृष्णदेव शिंदे, प्रा. तेजल बहुले, प्रा. सायली पाटील, प्रा. धन्वंतरी नरवडे, प्रा. गीतांजली धांडोरे यांनी सहकार्य केले. समारोप समारंभाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा. रामदास लाड यांनी केले तर उपस्थितांचे आभार डॉ. सारिका मोहोळ यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.