Maval Corona News : दिलासादायक! केवळ 01 रूग्णाचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात मंगळवारी (दि.09 ) 01 रुग्णाचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर तालुक्यात दिवसभरात 05 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आज एकही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला नाही. आतापर्यंत 524 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.सद्यस्थितीत उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 25 आहे.

शहरी भागात 01 तर ग्रामीण भागात एकही रूग्ण आज सापडला नाही. आज तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत 01 रूग्ण सापडला तर लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीत आज एकही रूग्ण सापडला नाही.आणि वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीतही आज एकही रूग्ण सापडला नाही.

तालुक्यातील कोरोना बाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या 27,685 झाली आहे. तर दिवसभरात 05 रुग्ण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले. मंगळवारी कोरोना रुग्णांमध्ये ग्रामीण भागात एकही रूग्ण आज सापडला नाही.

आतापर्यंत 27,136 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर 524 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 8,837, लोणावळा नगरपरिषद हद्दीत 4,540 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 1,377 रुग्ण सापडले आहेत. शहरी भागात 14,754 रुग्ण तर ग्रामीण भागात 12,931 रुग्ण आढळून आले आहेत.

एकही रुग्णाची परिस्थिती गंभीर नाही. कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 98.02 टक्के आहे तर मृत्यू दर 1.89 टक्के आहे. सद्यस्थिती तळेगाव दाभाडे नगरपरिषद मध्ये 09, लोणावळा नगरपरिषदमध्ये 05, वडगाव नगरपंचायतमध्ये 03 व ग्रामीण भागात 08 असे एकूण 25 रुग्ण आहेत अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.