Maharashtra Corona Update : राज्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल, तीन दिवसांपासून एक हजाराहून कमी कोरोना रुग्ण

एमपीसी न्यूज – महाराष्ट्राची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू आहे. मागील तीन दिवसांपासून राज्यात एक हजाराहून कमी कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून ॲक्टिव्ह कोरोना रुग्णसंख्या देखील मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहे. राज्यात आज (मंगळवारी) 982 नव्या रुग्णांची नोंद झाली असून, 1 हजार 293 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रूग्णांची संख्या 66 लाख 19 हजार 329 एवढी झाली आहे. त्यापैकी 64 लाख 61 हजार 956 रूग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट वाढून 97.62 टक्के झाला आहे.

सध्या राज्यात 13 हजार 311 ॲक्टिव्ह कोरोना रुग्णावर उपचार सुरू आहेत. आज 27 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. आजवर 1 लाख 40 हजार 430 जण कोरोनामुळे दगावले आहेत. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के एवढा आहे.

महाराष्ट्रात आतापर्यंत 6 कोटी 33 लाख 99 हजार 355 नमूने तपासण्यात आले आहेत. सध्या राज्यात 867 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत तर, 1 लाख 33 हजार 262 जण होम क्वारंटाईन आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.