Maval News: खासदार श्रीरंग बारणे यांचा रेल्वे अधिकाऱ्यांसह गुरुवारी पाहणी दौरा

एमपीसी न्यूज – रेल्वे विभागामार्फत मावळ लोकसभा मतदारसंघातील देहूरोड, वडगाव, कान्हे फाटा, कामशेत येथे सुरु असलेल्या आणि विविध कारणांमुळे रखडलेल्या कामांची खासदार श्रीरंग बारणे गुरुवारी (दि.26) पाहणी करणार आहेत.

रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सकाळी 11 वाजल्यापासून प्रत्यक्ष जागेवर जाऊन कामांचा आढावा, सद्यस्थितीतील परिस्थिती याची माहिती घेतली जाणार आहे. काम रखडल्याची कारणे जाणून घेऊन त्यातून मार्ग काढण्यात येणार आहे.

खासदार बारणे यांच्यासोबत या पाहणी दौऱ्यांत रेल्वे विभाग पुणे परिमंडलाच्या मुख्य प्रबंधक (डीआरएम) रेणू शर्मा, वरिष्ठ मंडल प्रबंधक सुनील मिश्रा, पियुष चतुर्वेदी, गौतम मुसळे, विकास कुमार हे अधिकारी सहभागी असणार आहेत.

देहूरोडला गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रीय महामार्ग 14 येथे पुलाचे काम चालू आहे. या ओव्हर ब्रीजच्या कामाची गती मंदावली आहे. काम गतीने पूर्ण करण्यासाठी प्रत्यक्ष पाहणी करुन अधिकाऱ्यांना सूचना दिल्या जाणार आहेत. वडगाव येथे सब-वे केला जाणार असून विद्युत पोलच्या शिफ्टींगमुळे काम अनेक दिवसांपासून बंद पडले आहे. कान्हे फाटा येथील ओव्हर ब्रीज आणि सब-वेचे काम सुरु आहे. कामशेत येथील सब-वेचे काम पाणी साचल्यामुळे रखडले आहे. या विविध प्रश्नांबाबत नागरिकांच्या तक्रारी आहेत. रेल्वे संदर्भात चालू असलेल्या कामांबाबत स्थानिक नागरिकांच्या तक्रारी आहेत. नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी खासदार बारणे गुरुवारी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह कामाची पाहणी करणार आहेत. कामे कशामुळे रखडली आहेत. त्याची माहिती घेऊन त्यातून तोडगा काढण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.