Maval News : मावळ तालुका वारकरी संप्रदाय मंडळाची ‘गाव तेथे सभासद’ संकल्पना

एमपीसी न्यूज – मावळ तालुका वारकरी संप्रदाय मंडळाच्या वतीने मार्गदर्शन मेळावा व नियुक्ती पत्रे प्रदान समारंभ घेण्यात आला. तसेच वारकरी मंडळाच्या माध्यमातून धर्म जोपासना, आध्यात्मिक व सामाजिक कार्य घडावे, या उद्देशाने तालुक्यात महिनाभर नवीन सभासद अभियान राबविण्यात आले. ‘गाव तेथे सभासद’ या संकल्पनेतून प्रत्येक गावात ग्रामप्रतिनिधींची निवड करण्यात आली.

नवीन ग्राम प्रतिनिधींना मार्गदर्शन करण्यासाठी कान्हे येथील साईबाबा सेवाधाम प्रकल्पात शंकर महाराज मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली मेळावा घेण्यात आला. मेळाव्यात महाराष्ट्र-छत्तीसगड हिंदू जनजागरण समितीचे संघटक सुनील घनवट, राजस्थान वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष रमेशसिंह व्यास व भास्करराव खैरे यांनी संघटनात्मक आध्यात्मिक कार्याविषयी मार्गदर्शन केले. मान्यवरांच्या हस्ते विभागीय अध्यक्ष, विभाग प्रमुख, ग्रामप्रतिनिधी म्हणून 350 सभासदांना नियुक्ती पत्रे प्रदान करण्यात आली.

यावेळी माजी आमदार दिगंबर भेगडे, भारतीय किसान संघाचे माजी जिल्हाध्यक्ष शंकरराव शेलार, ज्ञानेश्वर महाराज ठाकर, मुकुंद नाना राऊत, देवराईचे अध्यक्ष सुकन बाफना, रघुनाथ महाराज लोहोर, माऊली शिंदे, संतोष कुंभार, तुकाराम गाडे, मधुकर महाराज गराडे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संयोजन दीपक वारींगे, देवराम सातकर, शांताराम लोहोर, शांताराम गायखे, नितीन अडिवळे, शिवाजी पवार, सुनील वरघडे, बळवंत येवले, भरत ठाकर, सागर शेटे, नाथा महाराज शेलार, पंढरीनाथ शेटे, भरत येवले, सुभाष पडवळ, लक्ष्मण ठाकर आदींनी केले. रामदास पडवळ यांनी स्वागत केले. मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार महाराज भसे यांनी प्रास्ताविक केले, उपाध्यक्ष दिलीप वावरे यांनी सूत्रसंचालन केले. बजरंग घारे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.