Criminal arrested : मोक्का अंतर्गत दाखल गुन्ह्यात दीड वर्षांपासून फरार आरोपीस गावठी पिस्टलसह अटक

एमपीसी न्यूज : मोक्का अंतर्गत दाखल गुन्ह्यात दीड वर्षांपासून फरार आरोपीस पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे.(Criminal arrested) एक गावठी पिस्टल सह या आरोपीस अटक करण्यात आले आहे. रूत्तीक एखंडे, वय 22 वर्षे, रा. म्हात्रे पुलाजवळ,  एरंडवणे गावठाण, पुणे या आरोपीस अटक करण्यात आले आहे.

 

पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी अवैध शस्त्रे वापरणाऱ्या व त्याची विक्री करणाऱ्या रेकॉर्डवरील आरोपींची माहिती काढून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याबाबत गुन्हे शाखेच्या शस्त्रविरोधी पताका सूचना दिल्या होत्या. त्यानुसार डॉ. काकासाहेब डोळे, पोलीस उप-आयुक्त, मुख्यालय/ गुन्हे, पिंपरी चिंचवड व पद्माकर घनवट, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली शस्त्र विरोधी पथकाचे साहेब पोलीस निरीक्षक अमरीश देशमुख, अधिकारी व अंमलदार हे रेकॉर्डवरील आरोपींबाबत गोपनीय माहिती काढत होते.

Savitribai Phule University : नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी विद्यापीठात स्वतंत्र कक्ष होणार.!

शस्त्र विरोधी पथकास रेकॉर्डवरील आरोपीं बाबत मिळालेल्या गोपनीय माहितीचे तांत्रिक विश्लेषण शाखा पिंपरी चिंचवड यांच्या मदतीने विश्लेषण करत असताना पुणे पोलीस आयुक्तालय अंतर्गत उत्तम नगर पोलीस ठाण्यामध्ये संघटित गुन्हेगारी प्रतिबंधात्मक कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यात मागील दीड वर्षांपासून (Criminal arrested) फरार असलेला व नेहमी स्वतःजवळ अग्नि शस्त्रे बाळगणारा एक कुख्यात गुन्हेगार हा 16 ऑक्टोबर रोजी चांदणी चौक बावधन पुणे परिसरात येणार असल्याचे कळाले.

या मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने शस्त्र विरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी यांनी चांदणी चौक बावधन पुणे परिसरात सापळा रचून आरोपी रूत्तीक एखंडे याला संध्याकाळी 5 वा. वाजता ताब्यात घेतले होते. त्याच्या कमरेला एक गावठी बनावटीचे पिस्टल होते ज्यात एक जिवंत कारतूस होते.

या आरोपी विरुद्ध हिंजवडी पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 3 (25) सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1), (3) सह 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा आरोपी पुणे पोलीस आयुक्तालय अंतर्गत उत्तम नगर पोलीस ठाणे येथे भादवि कलम (Criminal arrested) 307, 201, 143, 147, 149, 120(b), भा. ह. का. कलम 3(25) मकोका कलम 3(1)(2)(4) पुण्यातील दीड वर्षांपासून फरार असून त्याच्याविरुद्ध कोथरूड पोलीस ठाणे, डेक्कन पोलीस ठाणे व उत्तम नगर पोलीस ठाणे येथे त्याच्यावर  गुन्हे दाखल आहेत.

ही कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त डॉ संजय शिंदे, पोलीस उपायुक्त मुख्यालय/ गुन्हे डॉ. काकासाहेब डोळे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे, पद्माकर घनवट, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे, डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली शस्त्रविरोधी (Criminal arrested) पथक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंबरिष देशमुख, पोलीस उपनिरीक्षक भारत गोसावी, ज्ञानेश्वर दळवी सहायक पोलीस उपनिरीक्षक एल के वाव्हळे, शाम शिंदे, पोलीस हवालदार प्रीतम वाघ, सी.एम गवारी, वसिम शेख, सागर शेळके, पोलीस शिपाई मोहसीन अत्तार तसेच तांत्रिक विश्लेषण विभाग गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय तुंगार, साहेब पोलीस निरीक्षक सागर पानमंद, राजेंद्र शेटे, नागेश माळी, अतुल लोखंडे, पोपट हुलगे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.